एका तळ्यात होती
एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु: ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गदिमांच्या कवितांवर थोरामोठ्यांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया
गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन...
मी जर राजा असतो तर कवीवर्यांच्या हाती सोनंच चढवलं असत.
- यशवंतराव चव्हाण (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या अन छंदांच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
- वि. वा. शिरवाडकर (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते)
असेच काही आणखी लेख:

No comments:
Post a Comment