Thursday, 23 April 2020

आव्हान - कुसुमाग्रज

आव्हान 


आव्हान - कुसुमाग्रज

बलवंता, आव्हान 
बळीचे बलवंता, आव्हान 
असेच चालूदे चहूकडुनी अखंड शरसंधान !

रक्ताने न्हाली 
तनू ही रक्ताने न्हाली
अन चाळणी जरी छातची पिंजूनिया झाली
काळजात उठती
कळा जरी काळजात उठती
बळी गिळाया घरगिधाडे घोटाळत वरती !
लवहि न आशंका
परंतु लवहि न आशंका
समर पुकारित राहील नित  हा रणशाली डंका !

बुरुजावरती निशाण 
उभे हे बुरुजावरती निशाण 

Saturday, 18 April 2020

एक जानेवारी - एक संकल्पदिन (पू.ल. देशपांडे)

एक जानेवारी - एक संकल्पदिन 


एक जानेवारी - एक संकल्पदिन (पू.ल. देशपांडे)



नववर्षाचा संकल्प अनेकजणांसाठी वेगवेगळा अनुभव असतो.
तो संकल्प कुणाचा दुसऱ्याच दिवशी मोडतो तर कोणी कोणी सात ते आठ दिवसांनी ढकलत ढकलत मोडतो... आणि काही जण गाडी वर्षभर रेटतात,

परिणाम स्वरूप काहीजण स्वतःला कमी लेखतात, आपण काहीच करू शकत नाही असा विचार करतात अन निराश होतात...
शेवटी एकच सांगतो, येथे कुणी काहीही LOAD घेऊ नये कारण कोणाचा गणपती दीड दिवसाचा असतो तर कोणाचा दहा दिवसाचा.... 

: गाठोडं - पी. ल. काका 


Friday, 17 April 2020

अरे खोप्यामधी खोपा कविता | सुगरणीचा खोपा - बहिणाबाई चौधरी



सुगरणीचा खोपा 

अरे खोप्यामधी खोपा


अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं

- बहिणाबाई  चौधरी



असेच काही आणखी लेख:




 

एका तळ्यात होती | गदिमांच्या कविता


एका तळ्यात होती

एका तळ्यात होती 


एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु: ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक


------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गदिमांच्या कवितांवर थोरामोठ्यांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया 


गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन...
मी जर राजा असतो तर कवीवर्यांच्या हाती सोनंच चढवलं असत.
          - यशवंतराव चव्हाण (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) 


माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या अन छंदांच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
            - वि. वा. शिरवाडकर (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते) 





असेच काही आणखी लेख:





Wednesday, 15 April 2020

पिंजरा - कुसुमाग्रज


पिंजरा 


पिंजरा - कुसुमाग्रज

पिंजरा तोडून
मुक्त झालेला तो पक्षी
जखमी पंखातील रक्ताने
हिरव्या भूमीवर
लाल नागमोड उमटवीत
उडतो आहे आपल्या घरट्याकडे,
कदाचित आपल्या मृत्यूकडेही.
पण
त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही
हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला
त्याचा आनंद ... अभिमान...
पिंजरा तोडल्याचा.