आव्हान
बलवंता, आव्हान
बळीचे बलवंता, आव्हान
असेच चालूदे चहूकडुनी अखंड शरसंधान !
रक्ताने न्हाली
तनू ही रक्ताने न्हाली
अन चाळणी जरी छातची पिंजूनिया झाली
काळजात उठती
कळा जरी काळजात उठती
बळी गिळाया घरगिधाडे घोटाळत वरती !
लवहि न आशंका
परंतु लवहि न आशंका
समर पुकारित राहील नित हा रणशाली डंका !
बुरुजावरती निशाण
उभे हे बुरुजावरती निशाण

No comments:
Post a Comment