Tuesday 4 August 2020

राजा शिवाजी


राजा शिवाजी
Chatrapati Shivaji Maharaj


६५ किलोची तलवार वागवितो, त्याच नाव येसाजी
२००० शत्रूंला एकटा नडतो, त्याच नाव बाजी 
हात तुटला तरीही शत्रूशी झुंजत राहतो, त्याच नाव तानाजी 
८ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो, त्याच नाव संताजी 
शत्रूच्या छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याच नाव धनाजी 
ढाण्या वाघाला उभा फाडतो, त्याच नाव संभाजी
अन, 
ह्या सर्वांना एकत्र घेऊन जो स्वराज्याच तोरण बांधतो, त्याच नाव शिवाजी. 



Credits 
Vishwas Nangare Patil
Google
शिवचरित्र 


Wednesday 13 May 2020

विझलो आज जरी मी


विझलो आज जरी मी
अंत

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही...
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी...
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही...

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे...
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही...

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर...
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही...
- सुरेश भट

आणखी काही आठवणीतले लिखाण:

Reference
मराठी साहित्य







 

Thursday 23 April 2020

आव्हान - कुसुमाग्रज

आव्हान 


आव्हान - कुसुमाग्रज

बलवंता, आव्हान 
बळीचे बलवंता, आव्हान 
असेच चालूदे चहूकडुनी अखंड शरसंधान !

रक्ताने न्हाली 
तनू ही रक्ताने न्हाली
अन चाळणी जरी छातची पिंजूनिया झाली
काळजात उठती
कळा जरी काळजात उठती
बळी गिळाया घरगिधाडे घोटाळत वरती !
लवहि न आशंका
परंतु लवहि न आशंका
समर पुकारित राहील नित  हा रणशाली डंका !

बुरुजावरती निशाण 
उभे हे बुरुजावरती निशाण 

Saturday 18 April 2020

एक जानेवारी - एक संकल्पदिन (पू.ल. देशपांडे)

एक जानेवारी - एक संकल्पदिन 


एक जानेवारी - एक संकल्पदिन (पू.ल. देशपांडे)



नववर्षाचा संकल्प अनेकजणांसाठी वेगवेगळा अनुभव असतो.
तो संकल्प कुणाचा दुसऱ्याच दिवशी मोडतो तर कोणी कोणी सात ते आठ दिवसांनी ढकलत ढकलत मोडतो... आणि काही जण गाडी वर्षभर रेटतात,

परिणाम स्वरूप काहीजण स्वतःला कमी लेखतात, आपण काहीच करू शकत नाही असा विचार करतात अन निराश होतात...
शेवटी एकच सांगतो, येथे कुणी काहीही LOAD घेऊ नये कारण कोणाचा गणपती दीड दिवसाचा असतो तर कोणाचा दहा दिवसाचा.... 

: गाठोडं - पी. ल. काका 


Friday 17 April 2020

अरे खोप्यामधी खोपा कविता | सुगरणीचा खोपा - बहिणाबाई चौधरी



सुगरणीचा खोपा 

अरे खोप्यामधी खोपा


अरे खोप्यामधी खोपा
सुगडिणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिल्लं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिल्लांमधी जीव
जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा बघ रे माणसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
दोन हात, दहा बोटं

- बहिणाबाई  चौधरी



असेच काही आणखी लेख:




 

एका तळ्यात होती | गदिमांच्या कविता


एका तळ्यात होती

एका तळ्यात होती 


एका तळ्यांत होती बदकें पिलें सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु: ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनीं परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले तो राजहंस एक


------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गदिमांच्या कवितांवर थोरामोठ्यांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया 


गदिमांच्या काव्य प्रतिभेवर प्रसन्न होऊन...
मी जर राजा असतो तर कवीवर्यांच्या हाती सोनंच चढवलं असत.
          - यशवंतराव चव्हाण (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) 


माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या अन छंदांच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
            - वि. वा. शिरवाडकर (ज्ञानपीठ पुरस्कार विजेते) 





असेच काही आणखी लेख:





Wednesday 15 April 2020

पिंजरा - कुसुमाग्रज


पिंजरा 


पिंजरा - कुसुमाग्रज

पिंजरा तोडून
मुक्त झालेला तो पक्षी
जखमी पंखातील रक्ताने
हिरव्या भूमीवर
लाल नागमोड उमटवीत
उडतो आहे आपल्या घरट्याकडे,
कदाचित आपल्या मृत्यूकडेही.
पण
त्याच्याकडे करुणेने पाहणारे सारे आकाशही
हिरावून घेऊ शकत नाही
रक्तात माखलेला
त्याचा आनंद ... अभिमान...
पिंजरा तोडल्याचा.